शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट स्वत: तपासणार सीसीटीव्ही फुटेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:20 IST

कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत: तपासण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनी यांना सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देआयुर्वेद संस्थेवर नाराजी : प्रवेश चाचणीत गोंधळ झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने शुक्रवारी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत: तपासण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनी यांना सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात किशोर सोनवणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने वेगवेगळ्या तारखांना न्यायालयात दोन प्रतिज्ञापत्र सादर करून चाचणीत ‘मास चिटिंग’ झाली नसल्याचा दावा केला तसेच, याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीनेही चाचणी नियमानुसार झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. परंतु, आयुर्वेद संस्थेच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने आयुर्वेद संस्थेला दोन्ही प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचा आदेश देऊन सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. न्यायालयाच्या आदेशामुळे चाचणीचा निकाल स्थगित आहे. प्रकरणावर आता १० आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप ढोरे तर आयुर्वेद संस्थेतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर व अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरण२४ जून २०१८ रोजी देशातील २० शहरांमध्ये अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश चाचणी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. याचिकाकर्त्यांनी लगेच परीक्षा अधिकाºयांकडे तक्रार केली, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली. परंतु याचिकाकर्त्यांचे कुणीच ऐकले नाही.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर