तेलंगणाला फळतंत्रज्ञान विकासासाठी सहकार्याचे सीसीआरआयकडून आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:03+5:302021-06-09T04:09:03+5:30
नागपूर : तेलंगणाला लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये पूर्णत: सहकार्य करण्याचे आश्वासन भारतीय कृषी अनुसंधान केंद्र आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्थेने ...

तेलंगणाला फळतंत्रज्ञान विकासासाठी सहकार्याचे सीसीआरआयकडून आश्वासन
नागपूर : तेलंगणाला लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये पूर्णत: सहकार्य करण्याचे आश्वासन भारतीय कृषी अनुसंधान केंद्र आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्थेने दिले आहे. या संस्थेच्या वतीने व फलोत्पादन विभाग तेलंगणा यांच्या सहकार्याने लिंबूवर्गीय पिकांवरील लागवड विषयावर झालेल्या ऑनलाइन चर्चासत्रात यावर चर्चा झाली.
सतगुडी मोसंबी लागवडीवरील अडचणी ओळखून त्यावर समाधान व पिकाचा शिवार मसुदा प्रदान करण्यासाठी हे चर्चासत्र होते. फलोत्पादन विभाग तेलंगणाचे संचालक डॉ. एल. वेंकटराम रेड्डी यांनी तेलंगणा राज्यातील लिंबूवर्गीय फळउद्योगातील शुष्क मूळकूज, लाल कोळीचा प्रादुर्भाव, अन्नद्रव्याची कमतरता, खैऱ्या रोग आदींवर प्रकाश टाकला. या मुद्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर, सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी भारतीय लिंबूवर्गीय फळ उद्योग आणि विशेषतः तेलंगणातील लिंबूवर्गीय उद्योगातील आवश्यकतांवर भर दिला. तंत्रज्ञानासाठी वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून आधुनिक लिंबूवर्गीय फळतंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी राज्य कृषी विभागाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
चर्चासत्रात तेलंगणाच्या जिल्हा फलोत्पादन आणि रेशीम उद्योग अधिकारी संगीता लक्ष्मी, डॉ. ए.ए. मुरकुटे, डॉ. एन. विजयाकुमारी, डॉ. आर. के. सोनकर, डॉ. ए.के. श्रीवास्तव, डॉ. जी.डी. मेश्राम, डॉ. ए.डी. हुच्चे, डॉ. जी.टी. बेहरे, डॉ. आशिष कुमार दास, डॉ. दिनेश कुमार यांनी विवध विषयांवर सादरीकरण केले.