CBI probes decomposed betel nut imports in Nagpur | नागपुरातील सडकी सुपारी आयातीचा तपास सीबीआयकडे?
नागपुरातील सडकी सुपारी आयातीचा तपास सीबीआयकडे?

ठळक मुद्देहायकोर्ट देणार निर्णय : जनहित याचिका प्रलंबित

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सडक्या सुपारीची आयात व तस्करीच्या प्रकरणांचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ निर्णय घेणार आहे. या मुद्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
यासंदर्भात सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. मेहबूब चिमठाणवाला यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. भारतात इंडोनेशियातून सडकी सुपारी आयात केली जाते. ती सुपारी रोड व अन्य मार्गाने भारतात आणली जाते. अशी सुपारी बाजारात सर्रास विकली जात असल्यामुळे कर्करोग व अन्य गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. याशिवाय छुप्या पद्धतीने सुपारी आयात केली जात असल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

Web Title: CBI probes decomposed betel nut imports in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.