गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:20+5:302021-06-02T04:08:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांच्या पथकाने उमरेड परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना ...

गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेलिसांच्या पथकाने उमरेड परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, वाहनातील २० गुरांची सुटका करीत एकूण ९ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
उमरेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना उमरेड परिसरातून गुरांची नागपूरच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी उमरेड परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-४०/बीएल-१८१६ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये २० जनावरे काेंबली असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकमधील समीर अबिग खान (३५, रा. पिलीनदी, झाेपडपट्टी, नागपूर) व कमलेश नत्थूलाल गुप्ता (३८, रा. आनंदनगर, नागपूर) या दाेघांना अटक केली.
या कारवाईत आराेपींकडून सहा लाख रुपयांचा ट्रक आणि ३ लाख ९० हजार रुपये किमतीची २० जनावरे असा एकूण ९ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून, ट्रकमधील सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याचे सांगितले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई ठाणेदार यशवंत साेलसे, हवालदार किशाेेर ठाकूर, प्रकाश मुरकुटे यांच्या पथकाने केली.