विदेशी दारूची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST2021-07-30T04:08:57+5:302021-07-30T04:08:57+5:30
नरखेड : जिल्ह्यात शेवटच्या टोकावर विदेशी दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नरखेड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सावनेरकडून पिंपळा (केवलराम) ...

विदेशी दारूची तस्करी पकडली
नरखेड : जिल्ह्यात शेवटच्या टोकावर विदेशी दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नरखेड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सावनेरकडून पिंपळा (केवलराम) कडे येणाऱ्या चारचाकी वाहनाची तपासणी करीत दारूची तस्करी उजेडात आणली. पोलिसांनी गाडी थांबविताच चालकाने गाडीचा वेग कमी केला. यानंतर लगेच त्यांना हुलकावाणी देत गावाच्या दिशेने गाडी पाळवली. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यावर गाडी पांदण रस्त्याने पळविण्याचा प्रयत्न केला. येथे चिखल असल्याने गाडी फसली. तेव्हा गाडी तशीच सोडून चालक व क्लीनरने तिथून पळ काढला. या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या २०० मि.लि. एकूण १६१ बॉटल्स व सेवरलेट बिट कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम.एच. ३२- वाय ४७६८ असा एकूण ३,४८,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डीबी पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोलीस कर्मचारी मनीष सोनोने, कैलास उईके, राजकुमार सातूर, दिगांबर राठोड यांनी केली.