झायलाेसह गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:58+5:302020-12-09T04:07:58+5:30
काेंढाळी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काेंढाळी (ता. काटाेल) येथे धाड टाकत गांजा विक्रेत्यास अटक केली. त्याने गांजा झायलाेच्या ...

झायलाेसह गांजा पकडला
काेंढाळी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काेंढाळी (ता. काटाेल) येथे धाड टाकत गांजा विक्रेत्यास अटक केली. त्याने गांजा झायलाेच्या डिक्कीत लपवून ठेवल्याने पाेलिसांनी झायलाे, गांजा व इतर साहित्य असा एकूण ५ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ७) रात्री करण्यात आली.
सुभाष सखाराम मंजुळकर (४९, रा. वडारपुरा, काेंढाळी, ता. काटाेल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साेमवारी रात्री काेंढाळी परिसरात गस्तीवर असताना त्यांना काेंढाळी येथील सुभाष मंजुळकर हा गांजा विकत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी त्याचे घर गाठून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने असंबद्ध उत्तरे देताच पथकाने त्याच्या घराची तसेच त्याच्याकडे असलेल्या एमएच-३१/ईए-३७९५ क्रमांकाच्या झायलाेची कसून झडती घेतली.
त्यांना झायलाेच्या डिक्कीत ठेवलेल्या पिशवीमध्ये २१६ ग्रॅम गांजा आढळून आल्याने त्यांनी लगेच सुभाषला अटक केली. शिवाय, त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीची झायलाे, दाेन हजार रुपये किमतीचा गांजा आणि ५०० रुपयाचा माेबाईल फाेन असा एकूण ५ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. त्याला काटाेल येथील न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे, असे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राम ढगे करीत आहेत.