गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:22+5:302021-04-11T04:08:22+5:30

माैदा : पाेलिसांनी शुक्रवारी (दि. ९) रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास वडाेदा येथे केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक ...

Cattle transport vehicle seized | गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

माैदा : पाेलिसांनी शुक्रवारी (दि. ९) रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास वडाेदा येथे केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ३० जनावरांची सुटका करण्यात आली असून, एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना माैद्याहून कामठीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने भंडारा-माैदा-नागपूर महामार्गावरील वडाेदा (ता. कामठी) येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी एमएच-४०/वाय-३३८२ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्यातच ट्रकचालकासह इतरांनी अंधाराचा फायदा घेत ट्रकमधून पळ काढला. या ट्रकमध्ये एकूण ३० जनावरे काेंबली हाेती. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याने ट्रकसह जनावरे जप्त करण्यात आली.

सुटका केलेल्या त्या गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आले. या कारवाईमध्ये १२ लाख रुपयांचा ट्रक आणि तीन लाख रुपये किमतीची ३० जनावरे असा एकूण १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. यातील आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक नितीन आगाशे, रवींद्र बकाल, काेमल कडू, मनाेज लांजेवार यांच्या पथकाने केली.

Web Title: Cattle transport vehicle seized