शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईबची निदर्शनेे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:29 AM

Castribe's protests राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण नाकारल्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे शुक्रवारी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी-विभागीय आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये ३३ टक्के आरक्षण नाकारल्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे शुक्रवारी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात नारे-निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळातर्फे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

मागासवर्गीयांना कर्नाटक व इतर राज्यात पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात येत आहे. मात्र राज्य शासन हे आरक्षण देण्यासाठी चालढकल करीत आहे. राज्य शासनाने १८ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीसाठी ३३ टक्के पदे राखून ठेवली होती. परंतु त्यानंतर ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे अचानक ७ मे रोजी मागासवर्गीयांवर अन्याय करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय ९ जून रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करताना राज्य शासनाने मागासवर्गीयांच्या विरोधात भूमिका घेतली असून पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारले आहे. हेतुपुरस्सर सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, अनेक विभागांनी मागासवर्गीयांना डावलून पदोन्नतीचे आदेश जारी केल्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणे हे असंवैधानिक असल्याची प्रतिक्रिया महासंघातर्फे व्यक्त करण्यात आली. तत्कालीन युती शासन व महविकास आघाडी हे दोन्ही सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सरचिटणीस नरेंद्र धनविजय, जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, राजकुमार रंगारी, परसराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, बबनराव ढाबरे, प्रेमदास बागडे, सुभाष गायकवाड, चंद्रदर्शन भोयर, विभूती गजभिये, जलिंधर गजभारे, गणेश सोनटक्के, दिलीप चौरे, अजय वानखेडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनSC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण