शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जातगणना होणारच, आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडणार

By कमलेश वानखेडे | Updated: November 6, 2024 17:31 IST

Nagpur : राहुल गांधी यांचा नागपुरातील संविधान संमेलनात निर्धार

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या ९० टक्के भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जातगणना आवश्यक आहे. ही मागणी जोर धरू लागल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे. जातगणना झाली तर देशाचे संविधान वाचेल. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काहीही चर्चा केली तरी जातगणना होणारच व आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडली जाईल, असा निर्धार काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे बुधवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी झाले. तत्पूर्वी त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, संमेलनाचे आयोजक उमेश कोर्राम, अनिल जयहिंद आदी उपस्थित होते. रेशीमबागेतील संघ मुख्यालयाच्या बाजूलाच होत असलेल्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवत हे एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र असल्याचे सांगितले. यात जे काही लिहिले आहे तेच सर्व महापुरुषांना अपेक्षित होते. यात हजारो वर्ष जुना समानतेचा विचार मांडण्यात आला आहे. कोणतीही एक व्यक्ती देशातील सर्व धन, शक्ती, भविष्य हिसकावून घेऊ शकत नाही. समानता, प्रत्येक जात धर्माविषयी आदर करावा हे यात लिहिले आहे. त्यामुळे भाजप, आरएसएस जेव्हा संविधानावर आक्रमण करते तेव्हा देशाच्या आवाजावर अतिक्रमण करतात. संविधानानुसार घटनात्मक संस्था चालतात. राजा महाराजांच्या काळात निवडणूक आयोग नव्हता. संविधान नसेल तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक हॉस्पिटल हे सर्व गायब होतील, असा धोका त्यांनी वर्तविला.

या देशातील ९० टक्के लोकांच्या हाती अद्याप पॉवर नाही. कॉर्पोरेट, मिडिया, न्यायव्यवस्थेत या ९० टक्के लोकांची भागिदारी नाही. हे लोक तुरुंगात, मनरेगाच्या तसेच विविध बांधकामांवर काम करताना दिसतात. मग कुणाचा विकास व प्रगती झाली. खासगी कंपन्यांच्या व्यवस्थापनात दलित, मुस्लिम, आदिवासी, अल्पसंख्याक दिसत नाहीत. ५ टक्के लोक देश चालवत आहेत. जातगणना झाली तर दलित, मुस्लिम, आदिवासी, अल्पसंख्याक या सर्व घटकांना कळेल की त्यांच्या हाती किती पॉवर व संपत्ती आहे. यामुळे एक स्पष्टता येईल. जातगणना ही विकासाची एक पद्धत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

आरएसएस संविधानावर मागून वार करतेआरएसएस संविधानावर कधीच थेट आक्रमण करीत नाही. ते घाबरतात, त्यामुळे समोरून येऊ शकत नाही. म्हणून ते विकास, प्रगती, इकॉनॉमी अशा शब्दांमागे लपून येतात. शिशु मंदिर, एकलव्य शाळांच्या मागे लपून येतात. येथे लागणारा पैसा हा मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातच्या सरकारचा व राष्ट्रीय महामार्गांचा आहे. अंबानी, अदानीचा पैसा आहे. त्यांचे लक्ष्य मागून सुरा खूपसणे हेच असते. त्यांच्यात दम असता तर ते समोरून आले असते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूरcongressकाँग्रेस