शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

सव्वाचार हजार अवैध वेंडर्सविरुद्ध गुन्हे दाखल; मध्य रेल्वेकडून ९७५ फूड स्टॉल्सवर छापे

By नरेश डोंगरे | Updated: April 4, 2025 21:40 IST

गेल्यावर्षी बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या फूड स्टॉलवरून विकण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमुळे अनेकांना विषबाधा झाली होती.

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचे प्रकरण सर्वत्र गाजल्याचे ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेच्या खान-पान (कॅटरिंग) विभाग तसेच अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर विशेष नजर रोखली. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरात सव्वाचार हजार अवैध खाद्य पदार्थ विकणाऱ्या (व्हेंडर्स)विरुद्ध कारवाई करण्यात आली.

गेल्यावर्षी बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या फूड स्टॉलवरून विकण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमुळे अनेकांना विषबाधा झाली होती. प्रवाशांनी त्या संबंधाने थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते. तेव्हापासून वाणिज्य विभागाने कॅटरिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. नागपूर विभागात येणाऱ्या विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरील ९७५ फूड स्टॉल्सवर छापे घालून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. धावत्या रेल्वेत खान-पान सेवा देणाऱ्या ८३२ मोबाइल कॅटरिंगची तपासणी करून त्यांना दर्जेदार खाद्य पदार्थ विकण्यास बजावण्यात आले. अनधिकृतपणे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये खाद्य आणि पेय विकणाऱ्या ४,२३५ वेंडर्सला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे चांगले परिणाम समोर आले.मार्च मध्ये ५७.२५ लाखांचे उत्पन्न

गेल्या वर्षभरात रेल्वेला कॅटरिंगमधून ९ कोटी, ५७ लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत हे उत्पन्न ५९ टक्के जास्त आहे. एकट्या मार्च २०२५ मध्ये कॅटरिंगची कमाई ५७ लाख २५ हजारांची आहे. गेल्या वर्षी ठरविलेल्या उत्पन्नाच्या टार्गेटपेक्षा हे ९ टक्के जास्त आहे.

नवीन करारातून ९.४५ कोटीयंदा नागपूर विभागातील सात रेल्वे स्थानकांना प्रतिष्ठित 'ईट राइट स्टेशन' प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. उच्च दर्जाची खानपान सेवा आणि स्वच्छतेसाठी हे प्रमाणपत्र दिल्या जाते. याशिवाय यावर्षी खानपान सेवे संबंधाने रेल्वेने १९ नवीन करार केले आहेत. त्यातूनही ९.४५ कोटी रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे