एसएनडीएलच्या लाचखोर कर्मचार्यांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: June 4, 2014 01:10 IST2014-06-04T01:10:17+5:302014-06-04T01:10:17+5:30
वीजचोरीचे प्रकरण दडपण्यासाठी ४0 हजारांची लाच मागणार्या एसएनडीएलच्या दोन कर्मचार्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज सापळा लावला. मात्र,

एसएनडीएलच्या लाचखोर कर्मचार्यांवर गुन्हे दाखल
वीजचोरीचे प्रकरण : लाच स्वीकारली, पळही काढला
नागपूर : वीजचोरीचे प्रकरण दडपण्यासाठी ४0 हजारांची लाच मागणार्या एसएनडीएलच्या दोन कर्मचार्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज सापळा लावला. मात्र, लाचेची रक्कम घेऊन कैलास चोरे आणि सागर नाईक हे लाचखोर पळून गेल्याने एसीबीच्या पथकाची काही वेळ चांगलीच भंबेरी उडाली.
आरोपींनी एका व्यक्तीच्या घराची वीजचोरी पकडली होती. त्याला गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची भीती चोरे आणि नाईकने दाखविली. हे प्रकरण दडपायचे असेल तर ४0 हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे या दोघांनी सुनावले. ३0 हजारात त्यांनी तडजोड केली. लाच द्यायची नसल्यामुळे तक्रारकर्त्याने (तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.) सरळ एसीबीच्या अधिकार्यांकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीच्या अधिकार्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आज या दोघांना गणेशपेठमध्ये बोलविण्यात आले. (प्रतिनिधी)