शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

मेयोतील प्रकरण :  सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत मृत्यूने गाठले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 8:32 PM

पाच महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीसाठी चकरा मारण्याची वेळ आली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय, असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्या कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे केला, आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसेवानिवृत्तीच्या दिवशीच आर्थिक लाभ देण्याकडे दुर्लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सेवानिवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. विशेषत: शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ देण्याचे निर्देश आहेत. त्याकरिता निवृत्तीच्या आठ महिन्याआधीच कागदपत्र तयार करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना आहेत. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. पाच महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीसाठी चकरा मारण्याची वेळ आली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय, असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्या कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे केला, आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.त्या कर्मचाऱ्याचे नाव कृष्णा धार्मिक असे आहे. प्राप्त माहितीनुसार, जुलै २०१९ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ मिळतील, अशी अपेक्षा होती. सेवानिवृत्तीनंतर पैशासाठी पहावी लागणारी वाट आणि मारावे लागणारे हेलपाटे आपल्या वाट्याला येणार नाही, याची त्यांना खात्री होती. सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. परंतु अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली. ज्याची भीती होती तेच झाले. मेयो रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता यांच्याकडे खेटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु ‘न्यू इनकॅशमेंट पेमेंट’ तातडीने मिळाले नाही. नियमानुसार, सेवानिवृत्तीच्या सहा ते आठ महिन्यापूर्वीच सेवा पुस्तिकेतील नोंदी पूर्ण करुन वेतन पडताळणी पथकाकडे पाठविणे आवश्यक होते. सेवानिवृत्तीच्या दिवशी संपूर्ण आर्थिक लाभ मिळावे, ही त्या मागची भूमिका आहे. परंतु मेयोतील निवृत्त झालेल्या १५ पेक्षा अधिक कर्मचारी अजूनही खेटे मारत आहेत. सेवानिवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. या घटनेचा धार्मिक यांना जबर धक्का बसला. धार्मिक यांच्या मृत्यूनंतर वेतनाचा प्रश्न कायम आहे. यामुळे तो त्वरित सोडवण्यात यावा यासाठी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटने (इंटक) च्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.संचालक व सचिवांनी याला गंभीरतेने घ्यावेसेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांचा आर्थिक लाभ देण्याचा नियम आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी याला गंभीरतेने घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात ती सोय झाली होती. परंतु आता वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने धार्मिकसारख्या कर्मचाऱ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालकांनी याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.त्रिशरण सहारेराष्ट्रीय,उपाध्यक्ष, यूथ इंटक

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Employeeकर्मचारी