शारजाह येथून आलेल्या ‘कोरोना’संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:40 IST2020-03-24T00:39:02+5:302020-03-24T00:40:27+5:30

शारजाह येथून आलेली एक ‘कोरोना’ संशयित महिला उत्तर प्रदेशात निघून गेल्यामुळे तिच्याविरूद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

A case has been registered against a 'corona' suspect woman coming from Sharjah | शारजाह येथून आलेल्या ‘कोरोना’संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

शारजाह येथून आलेल्या ‘कोरोना’संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शारजाह येथून आलेली एक ‘कोरोना’ संशयित महिला उत्तर प्रदेशात निघून गेल्यामुळे तिच्याविरूद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला काही दिवसापूर्वी शारजाह येथून नागपुरात आली होती. त्यामुळे तिला १४ दिवस ‘होम ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. परंतु, घरी राहून कंटाळल्यामुळे ही महिला कुणालाही न सांगता उत्तर प्रदेशातील जैनपूर येथे माहेरी निघून गेली. ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भेंडे ले-आऊटमधील रहिवासी आहे. कोरोना संशयित असूनही प्रवास केल्यामुळे सोनेगाव पोलिसांनी तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A case has been registered against a 'corona' suspect woman coming from Sharjah