शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नागपुरात  जंक्शन बॉक्सवर जाहिरात लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:59 IST

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्प विभाग : तिघांविरुद्ध अंबाझरी पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित जंक्शन बॉक्सेसवर रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वास केंद्र, सनबर्न रिलोड आणि जमशेदसिंह कपूर ज्योतिष विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी संपत्तीला नुकसान पोहोचवण्याबाबत कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी टी पॉईंट जंक्शनवर रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वास केंद्र, लॉ कॉलेज चौक रविनगपर चौक, भरतनगर चौक, फुटाळा तलाव टर्निंग व सुदामनगरी टर्निंगवरील जंक्शन बॉक्सवर सनबर्न रिलोड आणि जमशेद सिंह कपूर ज्योतिषचे पोस्टर लागलेले होते.शहरभरात सार्वजनिक संपत्तीवर बॅनर-पोस्टर, स्टीकर लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यासह शासकीय संपत्तीलाही नुकसान पोहोचते. यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत तक्रार दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकरणात आणखी तक्रारी करीत गुन्हे दाखल केले जातील.स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या तक्रारीवर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी जाहिराती लावणाऱ्या अशा सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.शहरातील भिंतीचे विद्रुपीकरणसार्वजनिक संपत्तीसह भिंती, चौक, उद्यान आदी ठिकाणी अवैध पद्धतीने बॅनर-पोस्टर, स्टीकर लावणाऱ्यांनी शहरातील भिंती विद्रुप करून ठेवल्या आहेत. या प्रकरणात यापूर्वीही झोनच्या सहायक आयुक्तांकडून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु नंतर कारवाई थंड बस्त्यात पडली. अशा परिस्थितीत पुन्हा अवैध जाहिराती लावणाऱ्यांची हिंमत वाढली. दंडासोबतच अशा जाहिराती लावणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmart Cityस्मार्ट सिटी