धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; नाना पटोले यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 14:00 IST2018-02-05T13:59:27+5:302018-02-05T14:00:02+5:30
धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र् यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केली आहे.

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; नाना पटोले यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: २०१६ मध्ये अमरावती येथे १० वर्षांच्या मुलाच्या नदीच्या खड्ड्यात पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी स्थानिक नगराध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर जसे गुन्हे दाखल झाले तसेच धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र् यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केली आहे.
नागपुरातील बजाजनगर येथील जयजवान जयकिसान कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जयजवान जयकिसानचे प्रमुख प्रशांत पवार उपस्थित होते.
शिंदखेडा , धुळे येथील 85 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मुंबईतील मंत्रलयाच्या सहाव्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ विषप्राशन करून आत्महत्या केली. यासाठी सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री व अधिका:यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या संपूर्ण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
दिवंगत पाटील यांनी 4 डिसेंबर 2017 रोजी नाशिक विभागाचे महसूल आयुक्तांना पत्रद्वारे त्यांना मिळणा:या शासकीय पूर्ण मोबदल्याविषयी माहिती दिली होती. त्याच पत्रत त्यांनी त्यांची मागणी मान्य न झाल्यास आत्महत्या करेल, असा इशाराही दिला होता. धर्मा पाटील यांनी मागील तीन वर्षात वेळोवेळी शासन दप्तरी, मंत्रलयात संबंधित मंत्र्यांकडे, तालुक्याचे लोकप्रतिनिधी व मंत्री यांन्च्याकडे दाद मागितली होती. परंतु जेव्हा त्यांना खात्री झाली की न्याय मिळणो शक्य नाही. तेव्हा त्यांनी विषप्राशन केले. म्हणून ही आत्महत्या नसून हत्या आहे.
3क् सप्टेंबर 2016 रोजी दोंडाईचे येथील नगरपालिका हद्दीतील अमरावती नदीच्या खड्डय़ात पडून दहा-बारा वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडला होता. तेव्हा शहराच्या नगराध्यक्षा, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती, इंजिनियर, आरोग्य निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांसह सरकरविरुद्धही खुनाचा गुन्ह दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.
आरोपीला वाचवणारे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन कसे ?
धुळे जिल्ह्यातीलच को-ऑपरेटिव्ह बँकेत 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. याप्रकरणी मंत्री व आमदारही आरोपी आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी प्रदीप पाडवी यांनी आरोपी आमदाराला अटक करताना कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा धोका असल्याने अधिकचा पोलीस बंदोबस्ताबाबत पत्र लिहिले होते. असे असतांना मुख्यमंत्र्यांनी या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या घामाचे पैसे लुटणा:या अशा दरोडेखोर आरोपीला वाचवणारे मुख्यमंत्री हे मिस्टर क्लीन कसे? असा प्रश्नही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.