‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:40 IST2018-04-13T23:40:14+5:302018-04-13T23:40:25+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.

The case of 'BCom', handed over to the Expert Committee | ‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाने घेतला निर्णय : विद्यार्थ्यांनी केला कुलगुरुंना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.
बी.कॉम. च्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर शुक्रवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत आलेल्या चुकीच्या प्रश्नांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित निर्णय घेतला. बीकॉम अंतिम वर्षाच्या फायनान्शियल अकाऊंटिंग- ३ या विषयाच्या तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले होते. पेपर सेटरने एका गाईडमधून प्रश्न चोरी केले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ही चोरी लपविण्यासाठी प्रश्नातील आकड्यांमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक २ (सी) व प्रश्न क्रमांक ३ (सी) मध्येही घोळ होता.
या संबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. लवकरच हे प्रकरण विषय तज्ज्ञ समितीकडे पाठविले जाईल. समितीच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल.
अधिकारीही मानत आहे चूक
 परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नपत्रिका पाहून त्यातील तीन प्रश्नात चुका असल्याचे मान्य केले. आकड्यांची हेराफेरी करण्यात ही चूक झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेला अंतिम रुप देताना आकड्यांचा ताळमेळ साधण्यात आलेला नाही, असेही यावरून दिसते.

Web Title: The case of 'BCom', handed over to the Expert Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.