आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली काेराेना लसीकरणाची तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:50+5:302021-01-13T04:20:50+5:30
उमरेड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणाची मंगळवारी रंगीत तालीम (ड्राय रन) पूर्ण केली. १६ जानेवारीला ...

आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली काेराेना लसीकरणाची तालीम
उमरेड : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणाची मंगळवारी रंगीत तालीम (ड्राय रन) पूर्ण केली. १६ जानेवारीला संभावित लसीकरणापूर्वी याबाबतच्या जय्यत तयारीसाठी ४५ आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी सात कर्मचाऱ्यांवर ड्राय रनची यशस्वी प्रयोगात्मक प्रक्रिया करण्यात आली.
प्रारंभी प्रतीक्षालयाच्या एका खोलीत या कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर नोंदणी आणि लसीकरणाची प्रक्रिया दुसऱ्या खोलीत केल्यानंतर ३० मिनिटे कशाप्रकारे काळजी घ्यावयाची याबाबतही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या खोलीत ‘ऑब्जर्वेशन’साठी ठेवण्यात येऊन आपात्कालीन परिस्थिती ओढवल्यास कशाप्रकारे कृती असावयास पाहिजे, याबाबतही या ड्राय रनच्या माध्यमातून लक्ष वेधल्या गेले. प्रकल्प प्रबंधक अश्विनी नागर, लसीकरण प्रबंधक मनीष विश्वकर्मा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अत्यंत सुलभपणे बारीकसारीक बाबींकडे लक्ष वेधले. शिवाय, कर्मचाऱ्यांना उद्भवलेल्या समस्यांचे योग्यपणे निराकरण केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, उमरेड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम आदींची उपस्थिती होती.