विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:38+5:302021-05-23T04:08:38+5:30
सावरगाव : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण काय असताना विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई ...

विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना टेस्ट
सावरगाव : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण काय असताना विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई करूनही काही नागरिक ऐकायला तयार नसल्याने प्रशासनाने शेवटी विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना टेस्ट करण्याची माेहीम हाती घेतली आहे.
सावरगाव (ता. नरखेड) येथे स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्राच्यावतीने नागरिकांची काेराेना चाचणी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट करण्यासाठी आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची माेबाईल टीम तयार करण्यात आली असून, त्यासाठी पाेलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली आहे. या टीमने शनिवारी (दि. २२) सावरगाव येथील बसस्थानक परिसरात ९४ नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि ३८ नागरिकांच्या ॲंटिजन तर प्राथमिक आराेग्य केंद्रात ४२ नागरिकांच्या ॲंटिजन व १०८ नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यात ८८ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे आळून आले.
नव्याने आढळून आलेल्या या ८८ नागरिकांमध्ये सावरगाव येथील ४९ जणांसाेबतच मसोरा येथील १२, मालापूर, सिंदी व मोहदी (दळवी) येथील प्रत्येही चार व इतर गावांमधील १२ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. देवेंद्र बारई यांनी दिली. या सर्व रुग्णांना शासनाच्या नवीन नियमानुसार नरखेड येथील काेविड सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे. सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील २७ काेराेना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात सावरगाव येथील ११ जणांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या माेबाईल टीममध्ये दिगांबर जायभाये, विद्या धुर्वे, योगेश कोल्हे, पोलीस शिपाई सुधाकर शेंदरे, आकाश राजणे यांचा समावेश हाेता.