काेराेना स्पेशल पार्सल ट्रेन पुन्हा चालवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:41+5:302021-04-10T04:08:41+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या इतवारी रेल्वे स्टेशनवरून खरगपूर, टाटा नगर, राऊरकेला, झारसुगडा स्टेशनसाठी ०८८१/०८८२ क्रमांकाची पार्सल स्पेशल ...

काेराेना स्पेशल पार्सल ट्रेन पुन्हा चालवावी
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या इतवारी रेल्वे स्टेशनवरून खरगपूर, टाटा नगर, राऊरकेला, झारसुगडा स्टेशनसाठी ०८८१/०८८२ क्रमांकाची पार्सल स्पेशल ट्रेन गेल्या वर्षी नियमित रूपाने सुरू हाेती. या काेराेना स्पेशल पार्सल गाड्यांनी स्थानिक व्यापारी व उद्याेजकांचा माल पाठविला जात हाेता. या गाड्यांमुळे रेल्वेला जवळपास ४० ते ५० लाखांचे उत्पन्न हाेत हाेते; मात्र ही स्पेशल ट्रेन बंद झाल्याने रेल्वेचे आर्थिक नुकसान हाेत असून, व्यापाऱ्यांचा कच्चा माल झारखंड, छत्तीसगड, बिहार व बंगालकडे पाठविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही स्पेशल पार्सल ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. याशिवाय ट्रेन क्रमांक ०११३ मुंबई शालिमार काेविड स्पेशल पार्सल ट्रेन इतवारी मार्गे चालविण्याची मागणीही केली जात आहे. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासह व्यापाऱ्यांना मालाची वाहतूक करण्यास मदत हाेईल, अशी भावना व्यापारी व पार्सल एजंट भास्कर अंबादे यांनी व्यक्त केली.