मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त

By योगेश पांडे | Updated: July 1, 2023 17:25 IST2023-07-01T17:25:38+5:302023-07-01T17:25:51+5:30

२७ जून रोजी रामदासपेठेतून प्रवीण चौबे यांची दुचाकी चोरी गेली होती.

Car thief arrested in Madhya Pradesh's Sarai, four bikes seized | मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त

मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त

नागपूर : विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाक्या चोरणाऱ्या सराईत वाहनचोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्केश उईके (२५, बैतूल, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

२७ जून रोजी रामदासपेठेतून प्रवीण चौबे यांची दुचाकी चोरी गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अल्केशवर पोलिसांना संशय गेला. त्याला मिठानीम दर्ग्याजवळून सापळा रचून पकडण्यात आले. त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली. रामदासपेठसोबतच त्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड, वाठोडा पोलीस ठाणे, कळमेश्वर येथूनदेखील दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाक्या जप्त केल्या. त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, विश्वनाथ चव्हाण, संतोष कदम, विनोद तिवारी, कैलास मगर, धीरज देशमुख, गणेश रंभापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Car thief arrested in Madhya Pradesh's Sarai, four bikes seized