कारची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST2021-02-07T04:08:57+5:302021-02-07T04:08:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाेन जण गंभीर जखमी झाले. ही ...

The car hit the bike | कारची दुचाकीला धडक

कारची दुचाकीला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आंभाेरा-कुही मार्गावरील खैरलांजी शिवारात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ऋषी रघुनाथ चाचेरकर (४५) व तुळशीदास पांडुरंग गाेंडाणे (५२) दाेघेही रा. मदनापूर, ता. कुही अशी जखमींची नावे आहेत. ऋषी चाचेरकर व तुळशीदास गाेंडाणे हे दाेघेही एमएच-३१/बीजे-६६४१ क्रमांकाच्या दुचाकीने कुही येथे जात हाेते. दरम्यान, खैरलांजी शिवारात समाेरून येणाऱ्या एमएच-४०/बीजे-९१०७ क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाेघेही गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वेलतूर पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमींना वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर दाेघांनाही नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार आनंद कविराज यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास संजय पायक करीत आहेत.

Web Title: The car hit the bike