उमरेड येथे तरुणांनी काढला कँडल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:53+5:302021-02-15T04:08:53+5:30

उमरेड : पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी रविवारी उमरेड येथील तरुणांनी कँडल मार्च काढला. ...

Candle march by youth at Umred | उमरेड येथे तरुणांनी काढला कँडल मार्च

उमरेड येथे तरुणांनी काढला कँडल मार्च

उमरेड : पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी रविवारी उमरेड येथील तरुणांनी कँडल मार्च काढला. उमरेड विधानसभा युवक कांग्रेसच्या वतीने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, केतन रेवतकर, रितेश राऊत, प्रफुल बानकर, अमित लाडेकर, बालाजी मुंगले, रोशन झाडे, चेतन पडोळे, राहुल चिचुलकर, प्रणय चौधरी, अजिंक्य ढाकने, रितिक पारवे, तनय लष्करी, तनिष्क मेश्राम, भूषण ब्रम्हे, आकाश बनकर, प्रफुल बेले, आदित्य चकोले, नीलेश कपूर, वैभव कुहिकर, प्रथमेश मेश्राम, वैभव गिरडकर, गणेश गेडेकर आदींसह राजाधिराज ढोलताशा पथक आणि ओम साई स्पोर्टिंग क्लबचे सदस्य उपस्थित होते. भारत माता की जय, जय जवान आदी नारे तरुणांनी यावेळी दिले.

Web Title: Candle march by youth at Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.