विदर्भाला कॅन्सरचा विळखा
By Admin | Updated: December 7, 2015 06:24 IST2015-12-07T06:24:26+5:302015-12-07T06:24:26+5:30
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली असता नागपुरात एका लाख लोकसंख्येमागे

विदर्भाला कॅन्सरचा विळखा
दीड वर्षानंतरही ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’चा पत्ता नाही : ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ कधी होणार ?
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली असता नागपुरात एका लाख लोकसंख्येमागे ९४ महिला तर ८१ पुरुष कॅन्सरने पीडित आहेत, तर मुंबईत हेच प्रमाण ९३ महिला तर ७१ पुरुष असे आहे, असे असतानाही नागपूरला डावलून मुंबईच्या केईएम रुग्णालयाला ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ मिळाले, तर नागपुरला ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ दिले. याची घोषणा होऊन दीड वर्ष झाले, मात्र, या सेंटरच्या प्रस्तावित जागेचा अद्यापही पत्ता नाही. विदर्भात वाढते कॅन्सरचे रुग्ण, उपलब्ध सोयी आणि नागपूर मेडिकलवर विदर्भासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश आणि झारखंडमधून येणाऱ्या कॅन्सर रुग्णांचा भार पाहता ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ऐवजी ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक तिसरा लागतो. अन्ननलिका, तोंडाच्या व इतर प्रकारातील कॅन्सरमध्ये राज्यात नागपूर पहिला क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे १० हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची नोंद होते.
उपराजधानीत मेडिकलमध्येच नाहीतर खासगी इस्पितळांमध्येही कॅन्सर रु ग्णांची संख्या वाढत आहे. यातील साधारण ६० टक्के रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु येथील कर्करोग विभाग मरणासन्न अवस्थेत आहे.
विदर्भावर अन्याय
४याच दरम्यान केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशात वाढत्या कॅन्सर रुग्णांसाठी २० राज्यांमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ४९ ठिकाणी‘सर्जरी कॅन्सर केअर’ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यात विदर्भावर अन्याय झाला. नागपूरच्या मेडिकलला डावलून मुंबईच्या केईएम रुग्णालयाला कॅन्सर इन्स्टिट्यूट दिले, तर नागपूरला ४५ कोटीचे ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’ मिळाले. मात्र, अद्यापही या सेंटरचे कार्य थंडबस्त्यात आहे. मेडिकलमध्ये कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘टर्सरी कॅन्सर केअर सेंटर’पेक्षा ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नाहीतर लाखामागे २२९ महिला तर १८२ पुरुषांना कॅन्सर
४राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून त्यात वाढ होत आहे. या शहरांमधील वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास केला तर नागपूरची स्थिती भयावह आहे. केंद्राने अलीकडेच देशातील आरोग्यसंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरु ष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.