शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर लक्षणांची माहिती गरजेची

By admin | Updated: November 9, 2014 00:52 IST

देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो,

बी.के.शर्मा यांचे प्रतिपादन : कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रमनागपूर : देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे संयुक्त संचालक डॉ. बी.के. शर्मा यांनी येथे केले. कॅन्सर जनजागृती आठवड्याच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘कॅन्सर जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली कोल्हे, डॉ.एस.बी.सप्रे, डॉ. सरिता कोठारी व डॉ. प्रशांत ढोके उपस्थित होते. डॉ. शर्मा म्हणाले, अनेक कॅन्सरच्या रुग्णांना लक्षणांची नीट माहिती राहत नाही. यामुळे ते तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. याविषयी हॉस्पिटलकडून जनजागृती केली जाईल, असेही ते म्हणाले. डॉ. देशपांडे म्हणाले, कॅन्सर जनजागृती सप्ताह आयोजित करणे आज गरजेचे झाले आहे. यामुळे अनेक माहिती जनतेपर्यंत पोहोचते. यावेळी तोंडाचा व स्तनाचा कॅन्सर आणि त्यावरील उपचाराची माहिती डॉ. कोल्हे, डॉ. सप्रे, डॉ. कोठारी व डॉ. ढोके यांनी दिली. हा कार्यक्रम कॅन्सर रिलीफ सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, हेडगेवार ब्लड बँक, संजीवनी, स्नेहांचल व आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला डॉ. बोदाले, व्ही.पी.चौबे, एच.व्ही.घारे, मंजिरी जोशी, रश्मी राऊत, विष्णू भारनागत, स्नेहल सावतकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)