विशेष ट्रेन नावाखाली सुरू असलेली भाडेवाढ रद्द करा - मनसे जनहित कक्षाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST2021-02-18T04:10:13+5:302021-02-18T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष ट्रेन नावाखाली सुरू असलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अशी ...

विशेष ट्रेन नावाखाली सुरू असलेली भाडेवाढ रद्द करा - मनसे जनहित कक्षाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष ट्रेन नावाखाली सुरू असलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी मनसे जनहित कक्षाने मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. देशात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी भारतीय रेल्वे मात्र अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. प्रशासनाद्वारे विशेष ट्रेन नावाखाली एकप्रकारची भाडेवाढ चालविली आहे. या माध्यमातून होत असलेली जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मनसे जनहित कक्षाने जिल्हाध्यक्ष इकबाल रिझवी यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. दुरोंतो व सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये सध्या जवळपास ३० टक्के भाडेवाढ करण्यात आली आली. वर्धा, अमरावती, काटोल व नागपूर जवळील इतर शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्या प्रवाशांना विशेष ट्रेन्समधून प्रवास करण्याची परवानगी देण्याची तसेच ज्येष्ठ नागरिक, १२ वर्षांखालील मुले यांना देण्यात येणाऱ्या पूर्ववत सवलती दिल्या जाव्यात, तसेच सर्व रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. शिष्टमंडळात जनहित कक्षाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस महेश जोशी, मंगेश डुके, विशाल बडगे, अरुण तिवारी, विकास साखरे आदी उपस्थित होते