शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

टॅब ठरू शकतो, नागपूर जि.प. निवडणुकीत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:02 PM

सदस्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने टॅबलेट दिले होते. पण कार्यकाळ संपल्यानंतर टॅब सदस्यांना आहे त्या अवस्थेत परत करायचे होते. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने पत्रही काढले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता ज्या माजी सदस्यांना जिल्हा परिषद निवडणुका लढायच्या आहे. त्यांच्यासाठी टॅब अडसर ठरू शकतो.

ठळक मुद्देजि.प.च्या माजी सदस्यांना परत करायचा आहे टॅब : सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढूनही सदस्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती ग्रामीण भागात तळागळात पोहचविण्यासाठी आणि सदस्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने सदस्यांना टॅबलेट दिले होते. पण कार्यकाळ संपल्यानंतर टॅब सदस्यांना आहे त्या अवस्थेत परत करायचे होते. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने पत्रही काढले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता ज्या माजी सदस्यांना जिल्हा परिषद निवडणुका लढायच्या आहे. त्यांच्यासाठी टॅब अडसर ठरू शकतो.सुरुवातीपासूनच टॅब चांगलाच चर्चेत राहिला. ज्या उद्देशाने सदस्यांना टॅबलेट देण्यात आले होते, तो उद्देश कधीच पूर्ण होताना दिसला नाही. कालांतराने टॅब एकाही जि.प.सदस्याकडे दिसून आला नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारने घोषित केलेल्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर जि.प. सदस्यही अपडेट व्हावा म्हणून जि.प.ने टॅब देण्याचा निर्णय घेतला. यासाठी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी जि.प. ला पत्र पाठवून टॅबलेटला मंजुरी दिली. यानंतर जि.प.ने निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून ४० हजार रुपये दराने ५८ टॅबसाठी २१ लाखाची तरतूद केली. मात्र निवडणुका लागल्यानंतर टॅब जि.प. प्रशासनाकडे परत करावा लागणार अशी अट होती. टॅब परत करण्याची अट घातल्यामुळे अनेकांनी नकार देऊन नंतर तो स्वीकारलाही. पण एक-दोन सदस्यांनी शेवटपर्यंत टॅबही स्वीकारला नाही. जिल्हा परिषद बर्खास्त झाल्यानंतर टॅब परत करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक सदस्यांना पत्र पाठवून विनंती केली.मात्र काही सदस्यांनी पत्र पाठविण्यापूर्वीच टॅब परत केला. तर काहींनी अजूनही टॅब दिला नाही. ज्यांनी टॅब परत केला नाही, त्यांना निवडणूक लढण्यास अडचण येणार आहे. तो परत केल्याशिवाय त्यांचा निवडणूक अर्ज मंजूर होऊ शकणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :tabletटॅबलेटzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकnagpurनागपूर