कॅम्पस क्लब हाऊसफुल्ल
By Admin | Updated: August 18, 2014 00:31 IST2014-08-18T00:31:20+5:302014-08-18T00:31:20+5:30
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमतने खास ‘कॅम्पस क्लब’ हे अभियान सुरू केले आहे. कॅम्पस क्लबच्या सदस्यता नोंदणीचा आजपासून शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कॅम्पस क्लब हाऊसफुल्ल
सदस्यता नोंदणी : बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमतने खास ‘कॅम्पस क्लब’ हे अभियान सुरू केले आहे. कॅम्पस क्लबच्या सदस्यता नोंदणीचा आजपासून शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे लोकमतने जोडले आहे.
लोकमत कॅम्पस क्लबमध्ये ५ ते १५ वर्षापर्यंत बालकांचा समावेश आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी या क्लबमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम, सहल, शारीरिकदृष्ट्या साहसाचे उपक्रम, सांस्कृतिक स्पर्धा आदी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याकरिता आज सकाळपासून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत लोकमत भवनापुढे गर्दी केली होती. सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ बिल्डर्स व डेव्हलपर्स सतीश मोहोड, स्नेह कोचिंग क्लासेसचे संचालक रजनीकांत बोंद्रे, सीईओ शाम शेंद्रे यांच्याहस्ते झाला. सदस्यता नोंदणी अभियान शहरातील सहा केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. सर्वच केंद्रावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. परिणामी पालकांकडून मागणी झाल्याने, सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम पुढेही सुरू राहणार आहे. बालकांना सदस्यता नोंदणीबरोबर भरपूर बक्षिसेही देण्यात आली. मुलांना राज्यस्तरीय लकी ड्रॉ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. ‘ज्ञानगंगा’ योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या बालकांना लॅपटॉपसह हॅण्डीकॅम कॅमेरा, प्ले स्टेशन, बीन बॅग, सायकल, कॅसीओ, आय पॉड, डीव्हीडी प्लेअर, वॉच, बॅगसह १०१ उत्तेजनार्थ भेटवस्तू बक्षिसात मिळणार आहे. यंदाचे ‘कॅम्पस क्लब’चे ब्रॅण्ड अॅम्बेसडर ‘डीआयडी लिटील मास्टर फेम’ तनय मल्हार, ‘सारेगम’फेम आनंदी जोशी आहेत.
‘कॅम्पस क्लब’च्या सदस्यत्वासाठी शुल्क १५० रुपये ठेवण्यात आहे. सदस्य झालेल्या प्रत्येकाला नोंदणी करताच वॉटर बॉटल, स्टोरी बुक, नमकीन, डायमंड नमकीन, दिनशॉज आईक्रिमचे कूपन, वाघमारे मिरची पावडर, सावजी मॅजिक मिक्स मसाला व सावजी मसाला, खिंडसी वॉटर पार्कचे कूपन, बॉयझोन हेअर कट कूपन व आकर्षक ओळखपत्र मिळेल. सदस्य नोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, वर्धा रोड, नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ व मोबाईल क्रमांक ९८२२४०६५६२, ९५५२५५६८३२, ९९२२९६८५२६, ९९२२२०००६३, ९९२२९१५०३५ या क्रमांकावर संपर्क करावा. (प्रतिनिधी)