शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!५० हून जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट, गळती ओळखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 10:19 IST

Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून  सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे. 

- सुमेध वाघमारे  नागपूर : मागील ११ महिन्यांत राज्यातील रुग्णालयांना लागलेल्या आगीत जवळपास ७२ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट व ऑक्सिजन गळती हे  मुख्य कारण होते. सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून  सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे.   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७५ ते ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. परिणामी, सर्वच ठिकाणी तुटवडा पडला. शेजारील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. यावर दाखल एका याचिकेवर न्यायालयाने ५० व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले. शासनानेही सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्याला गती दिली. यामुळे बहुसंख्य रुग्णालयांत हे प्लांट स्थापन झाले. परंतु ऑक्सिजनच्या गळतीकडे फारसे कोणाचे लक्ष नाही. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) मात्र ही बाब गांभीर्याने घेतली आहे. गळती ओळखण्यासाठी ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’चा प्रस्ताव तयार केला आहे.  

ऑक्सिजनगळतीमुळे येथे घडले मृत्युतांडव  - ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू.- २६ मार्च २०२१ रोजी भांडुपच्या ड्रीम मॉलमधील कोविड रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा मृत्यू- ९ एप्रिल २०२१ रोजी नागपूरमधील वाडी येथील ‘वेल्ट्रिट कोविड केअर सेंटर’च्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू.- २१ एप्रिल २०२१ रोजी  नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात लागलेल्या आगीत २४ रुग्णांचा मृत्यू.- २३ एप्रिल २०२१ रोजी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील आगीत १३ रुग्णांचा मृत्यू.- ६ नोव्हेंबर २०२१ रोजी अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा मृत्यू 

काय आहे ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’मेयोच्या बधिरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली शेलगावकर यांनी सांगितले, अनेकदा ऑक्सिजनगळती नजरेत येत नाही. स्पर्श करूनही कळत नाही. अशा वेळी ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ महत्त्वाचा ठरतो. हा कॅमेरा हातात पकडून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर लावल्यास गळती कुठे होते ते कळते. गळती होत असलेली जागा चिन्हांकित करते. या कॅमेऱ्यामध्ये किती दाबाने गळती होत आहे, याची माहितीही मिळते. गळतीचा फोटोही घेतला जाऊ शकतो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्र