नवरात्रीत कन्या पूजनासाठी बोलावून बालिकेसोबत छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 19:55 IST2021-10-13T19:55:08+5:302021-10-13T19:55:36+5:30
Nagpur News नवरात्रीत कन्या पुजनासाठी घरी बोलावलेल्या बालिकेसोबत एका युवकाने अश्लील चाळे केल्याची घटना वाडी ठाण्यांतर्गत घडली.

नवरात्रीत कन्या पूजनासाठी बोलावून बालिकेसोबत छेडखानी
नागपूर : नवरात्रीत कन्या पुजनासाठी घरी बोलावलेल्या बालिकेसोबत एका युवकाने अश्लील चाळे केल्याची घटना वाडी ठाण्यांतर्गत घडली. घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. रवींद्र भारत नेवारे (२२) असे आरोपीचे नाव आहे.
रवींद्र आपल्या भावासोबत राहतो. त्याने मंगळवारी सायंकाळी कन्या पुजनासाठी परिसरातील मुलींना आपल्या घरी बोलावले. पीडित ८ वर्षाची बालिका इतर मुलींपेक्षा उशिराने आली. त्यामुळे तिने उशीरा भोजन केले. दरम्यान, इतर मुली निघून गेल्या. रवींद्रने पीडित बालिकेला मोबाईलवर गाणे ऐकविले. त्याने संधी साधून बालिकेसोबत अश्लील चाळे केले.
दरम्यान, बालिका घरी न आल्यामुळे तिचे वडील रवींद्रच्या घरी गेले. त्याने मुलीला आपत्तीजनक अवस्थेत पाहिल्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी रवींद्रला पकडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांनी रवींद्रला बेदम मारहाण केली. नागरिकांनी वाडी पोलिसांना याची सूचना दिली. निरीक्षक ललिता तोडासे तसेच सहायक उपनिरीक्षक पाठक घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रवींद्रला अटक केली. त्याच्या विरुद्ध छेडखानी तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
............