शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केबल ऑपरेटरकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुभा : ट्रायचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:43 IST

लोकमत  न्यूज नेटवर्क  नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ...

ठळक मुद्देग्राहकांना सेवा पूर्ववत मिळणार

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ३१ मार्चपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे. ज्यांनी चॅनल निवडले आहेत, त्यांना पैसे परत मिळणार नाहीत. पण ज्यांचे महिनेवारी शुल्कानुसार चॅनल सुरू आहेत, त्यांची त्याच शुल्कात पेड चॅनलची सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशन विदर्भाचे अध्यक्ष सुभाष बांते यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.३१ मार्चपर्यंत ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच महिनेवारीनुसार शुल्क द्यायचे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास ग्राहक जर महिन्याला ३०० रुपये केबल शुल्क देत असेल त्याला तेवढ्याच किमतीचे पेड चॅनल पाहता येतील. ट्रायच्या नवीन आदेशामुळे पॅकेज निवडलेल्या ग्राहकांच्या प्रांतीय भाषांकडे लक्ष देणे कठीण होणार आहे. बांते म्हणाले, पॅकेजची निवड केलेल्यांची त्याच किमतीत केबल सेवा सुरू राहील. खरं पाहता १ जानेवारीपासून पॅकेज सिस्टीममुळे वसुलीवर बे्रक लागला आहे. ग्राहक नोंदणीसाठी एकाच वेळी येत असल्यामुळे यंत्रणेअभावी त्यांचे पॅकेज लॉगईन करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पण ग्राहकांना निरंतर सेवा देण्यासाठी केबल आॅपरेटर्स दिवसरात्र काम करीत आहेत.प्रारंभी १०० फ्री टू एअर चॅनलसाठी १३० रुपये आणि त्यावर १८ जीएसटी असे एकूण १५४ रुपये ग्राहकांना द्यायचे आहेत. त्यात २५ चॅनल दूरदर्शनचे असून उर्वरित भाषिक चॅनल्स आहेत. त्यानंतर ग्राहकांना एमएसओचे पॅकेज निवडायचे आहेत. ट्रायच्या आदेशानुसार ग्राहकांना १८ टक्के जीएसटीसह २५ पेड चॅनलसाठी २० रुपये नेटवर्क कॅपॅसिटी फी वेगळी लागणार आहे.बांते म्हणाले, सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीपूर्वी केबल इंडस्ट्री असंघटित होती, पण आता सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीमुळे ही इंडस्ट्री संघटित झाली आहे. प्रत्येक चॅनलवर जीएसटी आकारण्यात येत आहे. पूर्वीपेक्षा मार्जिन कमी झाली आहे. काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केबल ऑपरेटर्सतर्फे कर्मचाऱ्यांना संबंधित सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रायने तक्रारीसाठी कॉल सेंटर बनविले आहे. ब्रॉडकास्टर्सच्या जाहिरातींचा ओघ कमी झाल्यास पुढे पेड चॅनलचे दर कमी होतील. बांते म्हणाले, आमचे कमिशन अजूनही ठरले नाही. ते वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.पत्रपरिषदेत फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रभात अग्रवाल, संजय लाकूडकर आणि अनेक केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनnagpurनागपूर