शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

सीएंची चुकी कधीही दडपण्यात येत नाही : सीए प्रफुल्ल छाजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:18 AM

कोणत्याही प्रकरणात सीएंची चुकी असेल तर ती दडपण्याचा प्रयत्न आयसीएआय कधीही करीत नाही, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसीए कोर्सला आंतरराष्ट्रीय मान्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कागदपत्रांची पडताळणी आणि प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी आयसीएआय सदस्याची असते. सत्यम प्रकरणात दोषी सीएंवर कारवाई करण्यात आली होती. कोणत्याही प्रकरणात सीएंची चुकी असेल तर ती दडपण्याचा प्रयत्न आयसीएआय कधीही करीत नाही, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी येथे व्यक्त केले.आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे शुक्रवारी जीएसटीवर आयोजित कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य, सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, सचिव सीए साकेत बागडिया आणि उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी उपस्थित होते.छाजेड म्हणाले, आयसीएआयकडे नोंदणी नसलेल्या सीएद्वारे बनावट स्वाक्षऱ्या केल्याच्या तक्रारी आयसीएआयकडे प्राप्त व्हायच्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयसीएआयच्या व्यावसायिक विकास समितीने टप्प्याटप्प्याने युडीन म्हणजेच युनिक डॉक्युमेंट आयडेन्टिफिकेशन नंबरची एक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली. १ फेब्रुवारी २०१९ पासून अनिवार्य करण्यात आली. यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. यामुळे एनपीए अकाऊंटची माहिती तात्काळ मिळते. एका प्रश्नाच्या उत्तरात छाजेड म्हणाले, सीए विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोड सिस्टिम आहे. पेपरचे डिजिटल मूल्यांकन केले जाते. सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरचे पुनर्मूल्यांकन करावे वा नाही, याकरिता एक समिती नेमली असून चार महिन्यात अहवाल येणार आहे.जीएसटीला दोन वर्षे झाली आहेत. पुढे पुढे यातील त्रुटी दूर होणार आहे. परतावा लगेच मिळण्याची शक्यता आहे. खरी समस्या चेनमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राची सबका विश्वास, योजना अबकारी आणि सेवाकराशी प्रलंबित खटल्याशी संबंधित आहे. यात व्यापाऱ्यांना सूट देऊन कराची एकल रक्कम भरण्याची सोय आहे. त्याचा व्यापाऱ्यांना फायदाच होणार आहे. सीए कोर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. भारतीय सीएला ब्रिटनमध्ये एक पेपर देऊन सीएची मान्यता मिळते, असे छाजेड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chartered accountantसीएMediaमाध्यमे