लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे हे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली. यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश खवसे यांना ‘सी.मो. झाडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’, दिव्यांगांसाठी कार्य करणारे चंद्रपूरचे श्रीराम पान्हेरकर यांना ‘डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवा कार्य पुरस्कार’, व्यसनमुक्ती आणि भूदानाचे काम करणाºया यवतमाळ जिल्ह्यातील साखरा येथील सुशीला बिजमवार यांना ‘मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रात काम करणारे आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणारे नागपूरचे डॉ. डी. बी. बनकर यांना ‘ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करून सातत्याने जनजागृती करणारे डॉ. अशोक धाबेकर यांना ‘डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, सर्वोदयी विचारवंत अॅड. मा. म. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार १ जानेवारी २०१८ रोजी नागपूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सी. मो. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:41 IST
सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे हे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली.
सी. मो. झाडे फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
ठळक मुद्देलोकमतचे गणेश खवसे यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार