शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

छापील किमतीने खरेदी करा पाण्याची बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:42 PM

बाटलीबंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील बाटलीवर जी छापील किंमत आहे तेवढेच पैसे द्यावे, असे आवाहनदेखील वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.

ठळक मुद्देवैधमापन विभागाचे आवाहन : ग्राहकांनी तक्रार नोंदवावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाटलीबंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील बाटलीवर जी छापील किंमत आहे तेवढेच पैसे द्यावे, असे आवाहनदेखील वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.अतिरिक्त शुल्काद्वारे ग्राहकांची लूटथंड पाण्याची बॉटल खरेदी करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी आजाराच्या दृष्टीने पाणी खरेदी करावे लागते. थंड पाण्याचा वापर वाढला आहे. याचा गैरफायदा घेत दुकानदार १५ ते २० रुपयांच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीवर कुलिंग चार्ज म्हणून दोन ते चार रुपयांपर्यंत अतिरिक्त घेत ग्राहकांची लूट करीत आहेत. ग्रामीण भागात तर रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याने ही बाटली २० रुपयांपर्यंत जाते. वैधमापन विभागाकडून केवळ दुधाच्या पिशव्यांवर कारवाई होत होती. मात्र, राज्याचे वैधमापनशास्त्र विभागाने यासंबंधीचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैधमापनशास्त्र विभाग आता पाणी विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. शहरात दररोज विविध भागात सुमारे लिटरच्या २० हजारांपेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याची विक्री होते. दुकानदाराने एका बाटलीमागे दोन रुपये जरी अतिरिक्त घेतले तरी दिवसाला ४० हजार रुपये विक्रेते ग्राहकांच्या खिशातून काढत आहे.ग्राहकांनी तक्रारींसाठी पुढे यावेवितरकाकडून विक्रेत्याला नफा होईल, या हिशेबानेच घाऊक दरात बाटल्या दिल्या जातात. मात्र, अधिक नफा मिळवण्यासाठी दुकानदार कूलिंग चार्ज आकारतात. त्यामुळे ग्राहकांकडून अधिक पैसे घेणे थांबले नाही तर भविष्यात वितरकांनाही आरोपी करण्याचा इशारा वैधमापनशास्त्र विभागाने दिला आहे. यासाठी पाण्याच्या बाटलीसाठी अतिरिक्त पैसे घेणाऱ्या दुकानदाराविरुद्ध ग्राहकांनी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करणारतक्रारींच्या आधारे आणि नियमित तपासणी करताना बाटलीबंद पाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. अधिक पैसे घेणाºया व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्राहकांनीही यासाठी पुढे येऊन तक्रारीद्वारे या प्रकाराची माहिती द्यावी.हरिदास बोकडे, सहायक नियंत्रक,वैधमापनशास्त्र नागपूर विभाग.शीतपेय जास्त दरात विकणे गुन्हाचजाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करून एक लिटरच्या शीतपेयाच्या बाटलीसाठी ४० हून अधिक रुपये ग्राहकांना मोजायला लावतात. त्यातही किरकोळ विक्रेते यावरही अधिक शुल्क आकारतात. शीतपेय ही आरोग्यासाठी आवश्यक असलेली वस्तू नसली तरी बेकायदेशीरपणे अधिक रक्कम वसूल करणे हा गुन्हा ठरतो. दूध व बाटलीबंद पाणी यानंतर शीतपेय जादा दराने विकणाऱ्या विक्रेत्यांकडे कारवाईचा मोर्चा वळवण्यात येणार आहे. बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या, वितरक व किरकोळ विक्रेते यांना छापील किमतीपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांकडून घेता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.वैधमापन विभाग अशी करते कारवाईएखादी वस्तू जर पॅकेट्समध्ये बंद असेल तर त्या पॅकेटवर उत्पादकाचे व आयातदाराचे नाव, त्यातील घटक, एकूण वजन, एमआरपी, पॅकिंगची तारीख, कस्टमर केयरचा नंबर, एक्सपायरी डेट या सहा गोष्टी नमूद असणे आवश्यक असते. बाजारात मिळणाऱ्याआयातीत वस्तुंवरदेखील त्यांच्या आयातदाराचे तसेच त्याची पॅकिंग करणाऱ्यांची (इम्पोर्ट व पॅकर) नावे व पत्ते असणे आवश्यक असते. त्यापैकी एखादीही माहिती वस्तूवर नमूद नसेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. पॅकेज कमोडिटी कायदा-२०११ मधील तरतुदीनुसार कोणत्याही पॅकबंद वस्तूवर एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या विक्रेत्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यासाठी दोन ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. एमआरपीच्या किंमतीत खाडाखोड करणे किंवा पॅकबंद वस्तूवर किंमत न छापणे यांच्यावरही या कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येतो.   

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटरnagpurनागपूर