शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'पण आता सहन होत नाही...' रॅगिंगच्या अंधारात हरवलेली स्वप्नं !

By राजेश शेगोकार | Updated: March 30, 2026 13:02 IST

Nagpur : 'रात्री खूप भीती वाटते... सतत दडपण राहते... सिनियर्स काय करायला सांगतील, हेच कळत नाही... खूप सहन केलं, पण आता सहन होत नाही...' असा एखादा फोन वसतिगृहात राहणाऱ्या तुमच्या मुलामुलीने किंवा लहान बहीणभावाने केला अन् फोन कट झाला तर तुमची काय अवस्था होईल?

नागपूर : 'रात्री खूप भीती वाटते... सतत दडपण राहते... सिनियर्स काय करायला सांगतील, हेच कळत नाही... खूप सहन केलं, पण आता सहन होत नाही...' असा एखादा फोन वसतिगृहात राहणाऱ्या तुमच्या मुलामुलीने किंवा लहान बहीणभावाने केला अन् फोन कट झाला तर तुमची काय अवस्था होईल? आपल्या पाल्यांच्या चिंतेने झोप उडालेले पालक मिळेल त्या साधनाने वेळी अवेळी पाल्याकडे धावत सुटतील. पण, यामधील एखाद्याने असा फोन केलाच नाही अन् आयुष्य संपविले तर... त्यानंतरची असहाय्यता, वेदना आणि आयुष्यभर सलणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार..? एकेकाळी गमतीने चालणारे रॅगिंग कोणाचे मानसिक खच्चीकरण करत असेल तर तो केवळ कायद्याने गुन्हा ठरतोच, पण आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा भावनिक व सामाजिक गुन्हाही ठरतो. हे अधोरखित करण्याचे कारण म्हणजे नागपुरातील अलिकडच्या घटना.

नागपुरात राष्ट्रीय स्तरावरील विधी विद्यापीठ हे कायद्याचे ज्ञान देणारे, न्यायाची जाणीत रुजवणारे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा होती. पण, अल्पावधीतच या ज्ञानमंदिरात घडलेल्या रॅगिंगच्या घटनेने समाजमन हादरले आहे. वरिष्ठ विद्यार्थिनींकडून कनिष्ठ विद्यार्थिनींचा छळ हे केवळ धक्कादायक नाही, तर कायद्याच्या मूलभूत मूल्यांनाच हरताळ फासणारे आहे. कायद्याचे धडे गिरवणारे विद्यार्थीच जेव्हा कायद्याची पायमल्ली करतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक वेदनादायी ठरतो.

तीन महिन्यांपूर्वी नागपुरातीलच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील घटनाही अशीच. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी कनिष्ठांचा जवळपास २० दिवस छळ केला, ही बाब उघड झाल्यानंतर प्रशासनाने तीन महिन्यांसाठी वसतिगृहात येण्यास बंदी घालण्याची कारवाई केली खरी, पण त्या काळात पीडित विद्यार्थिनींनी सहन केलेल्या मानसिक यातना कोण मोजणार? मुळात रॅगिंगचे प्रकार हे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच अधिक आहेत. ज्या संस्थामध्ये प्रवेश घेऊन आयुष्याचे स्वप्न पालक व पाल्य मिळून जगतात, यासंस्थामध्ये प्रवेश घेणारे हे बुद्धिमान समजले जातात अशा पृष्ठभूमीवर रॅगिंगमधून आपण कुणाच्या तरी आयुष्याचा खेळ करणारे मानसिक खच्चीकरण करत आहोत याची जाणीव 'बुद्धी'ला होत नाही का?

रॅगिंग हा केवळ शिस्तभंगाचा प्रकार नाही, तर तो मानसिक छळाचा गंभीर गुन्हा आहे. अशा वाढत्या घटनांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेवर रॅगिंग रोखण्याची जबाबदारी आहे. मात्र, केवळ नियम करून चालणार नाही त्यांची कठोर अंमलबजावणी आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक आहे.

मानसिक आरोग्याचा प्रश्नही येथे तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य आणि मदत घेण्याची सवय लावणे गरजेचे आहे. रॅगिंग ही 'परंपरा' आहे, हा समज मोडून काढून, रॅगिंग म्हणजे 'गुन्हा' ही जाणीव प्रत्येकाच्या मनात रुजवली पाहिजे.

महाराष्ट्रात रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ नुसार, दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि १० हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे तरीही अशा घटना घडत असतील, तर प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर मानसिकतेचा आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि त्रासाची लक्षणे ओळखण्याबद्दल शिक्षित केले पाहिजे.

घरापासून लांब शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनातील नकारात्मक विचार सांगण्यासाठी विश्वासाचेही कोणी त्यांच्या आसपास नसते. अशा स्थितीत संस्थांनी सुरक्षित आणि भय व तणावमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. संस्थानी रॅगिंग रोखण्यासाठी हॉस्टेल्समध्ये रात्रीची गस्त, अचानक तपासणी आणि विद्यार्थी समुपदेशन यासारखे उपाय महाविद्यालयांकडून प्रभावीपणे केली पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांची तुम्ही रॅगिंग करता, तेही तुमच्यासारखीच स्वप्नं उराशी बाळगून इथे आलेले असतात. आपण गेल्यावर्षी 'भोगलं, म्हणून त्यांनीही भोगावं' ही साखळी कुणीतरी तोडलीच पाहिजे. नाहीतर... एखाद्या दिवशी वसतिगृहातील एक खाट रिकामी दिसेल, पुस्तकं तशीच उघडी राहतील आणि फोन कायमचा शांत होईल... पण त्या शांततेचा 'आक्रोश' मात्र आयुष्यभर तुमच्या बॅचच्या कानात घुमत राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Lost Dreams in Ragging's Darkness: 'Can't Take It Anymore'

Web Summary : Ragging incidents in Nagpur's educational institutions raise concerns about mental health and institutional responsibility. Strict enforcement of anti-ragging laws and a focus on creating supportive environments are crucial to prevent tragedies. Awareness and empathy are essential.
टॅग्स :nagpurनागपूर