शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
2
'मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्यूनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
3
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
4
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
5
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान
6
Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी
7
सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
8
फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!
9
विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?
10
'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार
11
एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव
12
तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत
13
'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का?
14
Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!
15
बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?
16
"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य
17
Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी
18
भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 
19
"आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला.."; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं?

बसपातही गोंधळ

By admin | Updated: January 29, 2017 01:48 IST

नागपूर महानगरपालिकेच्या विशेषत: उत्तर नागपुरातील जागा वाटपावरून बसपात गोंधळ उडला आहे. वरिष्ठ

जागा वाटपावरून कार्यकर्त्यांचा संताप : गरुड-उपासक यांच्याविरुद्ध रोष नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विशेषत: उत्तर नागपुरातील जागा वाटपावरून बसपात गोंधळ उडला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने ज्या उमेदवारांना तिकिटा मंजूर केल्या आहेत त्यातील काही नावांवरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. शनिवारी या कार्यकर्त्यांनी खुद्द प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रभारी उपासक यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केली व विरोध दर्शविला. कार्यकर्त्यांचा हा संताप इतका तीव्र होता की प्रदेशाध्यक्ष बैठकीतून निघून गेले. कार्यकर्ते सायंकाळपर्यंत त्यांची वाट पाहत राहिले.नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्की करण्यासाठी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे दोन दिवसांपासून कॉटन मार्केटस्थित हॉटेल गुजरात येथे थांबले होते. प्रदेश प्रभारी उपासकही आले. या दोघांच्या उपस्थितीत हॉटेल गुजरात येथे शहरातील काही जागा निश्चित करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. २०१२ ची पुनरावृत्ती होण्याची भीती २०१२ च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारी लादल्याने कार्यकर्त्यांची भांडणे झाली होती. इतकेच नव्हे तर काही ज्येष्ठ नेत्यांच्या घरावरही कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. तीच पुनरावृत्ती पुन्हा होण्याती भीती बसपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. बसपाची शनिवारी कुठलीही बैठक झालेली नाही. काल बैठक झाली. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या प्रदेशाध्यक्षांसह आम्ही विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहोत. तसेच निवडणुकीची ही वेळ आहे. काही कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही, तर नाराजी येत असते. बसपा सध्या वाढत आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेच पसरवलेले हे वृत्त असावे. - जितेंद्र म्हैसकर , प्रदेश महासचिव, बसपा