शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:53 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनी मांडल्या अडचणी : व्यवस्थापनाला शिस्त लावण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. चालक व वाहक सौजन्याने वागत नाही. अनेकदा पैसे ,दिल्यानंतरही प्रवाशांना तिकिटी मिळत नाही. अशा तक्रारी शहर बसमधील प्रवाशांनी मांडल्या.शहरातील नागरिकांना उत्तम परिवहन सेवा मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे आपली बस सेवा चालविली जाते. मात्र बसमधुन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा तक्रारी नागरिकांकडून मांडल्या जातात. प्रवाशांच्या तक्रारी आणि आपली बस मधील व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापौरसंदीप जोशी यांनी शहर बसमधून प्रवास करून थेट प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे उपस्थित होते.जोशी व कुकडे यांनी आकाशवाणी चौक ते संविधान चौक दरम्यान बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे बस ऑपरेटचे अधिकारी व  प्रतिनिधी उपस्थित होते.. अनेकदा वाहकांकडून तिकीट दिले जात नाही, स्थानकावर बस थांबत नाही. बस वेळेवर येत नसल्याने प्रतिक्षा करावी लागते. यामुळे कार्यालयात जाण्याला उशिर होतो. अशा अनेक समस्या प्रवाशांनी मांडल्या. बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापौरांनी समस्या जाणून घेतल्या. बर्डी-शांतीनगर-कामठी मार्गावरील बसमधील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना पूर्ण तिकीट दिल्याची तक्रार बसमधील प्रवाशांनी केली. याबाबत संबंधित बस वाहकावर कारवाईचे निर्देश जोशी यांनी दिले.प्रवाशांशी सौजन्याने वागाशहर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचे चालक, वाहक योग्य वागणूक देत नसल्याची अनेक नागरिकांची तक्रारी आहेत. याची दखल घेत महापौरांनी कर्मचाऱ्यांना प्रवाशासोबत सौजन्याने वागण्याचा चालक व वाहकांना दिला. यावेळी विद्यार्थी तसेच नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. मोरभवन बस स्थानक परिसरातील रस्त्याची स्थिती वाईट आहे. यावर महापौरांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरpassengerप्रवासी