शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नागपूरच्या महालक्ष्मी कोराडी मंदिर परिसरात बसडेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:45 PM

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने बसडेपोचा विकास करण्यात आला आहे. ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्यात.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : ९ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने बसडेपोचा विकास करण्यात आला आहे. ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्यात.बसडेपोच्या देखभाल व दुरुस्तीसोबतच स्वच्छतेसंदर्भातील करार एनएमआरडी व महानगरपालिकेने केल्यानंतर ही जागा हस्तांतरित करावी, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.ताजबाग विकास आराखड्याला गतीताजबाग येथे मध्य भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी १३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून विकास आराखड्यानुसार बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ताजबाग ट्रस्टने पुढाकार घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. ताजबाग परिसरातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यामध्ये सरायचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी साडेसात लाख लिटर टाकीचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. या परिसरात ६० कोटींचे काम पूर्ण झाले असून ४२ कोटी रुपयांच्या निविदानुसार कामांना सुरुवात झाली आहे. पूर्ण झालेले काम हस्तांतरित करण्यात आले असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर