शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह ; घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 10:54 IST

घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे.

ठळक मुद्देयुवतीचा खून केला अन् पेट्रोल टाकून मृतदेह जाळलासुराबर्डी परिसरातील घटना

नागपूर : सुराबर्डी परिसरातील निर्जन ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रेताशेजारीच पेट्रोलची रिकामी बाटली आढळली. यावरून तिचा आधी खून करून नंतर जाळले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

निकिता लखन चौधरी (वय २२, गेडाम ले-आऊट, प्रतापनगर) असे युवतीचे नाव आहे. ती खामलामधील एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होती. मंगळवारी सकाळी ती कार्यालयात गेली. सायंकाळी पाच वाजता घरी जाण्यासाठी निघाली. परंतु ती घरी न पोहोचल्यामुळे कुटुंबीय घाबरले. मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी प्रतापनगर पोलिसात मिसिंगची तक्रार दिली.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुराबर्डीच्या निर्जनस्थळी बकरी चारणाऱ्या व्यक्तीला युवतीचा जळालेला मृतदेह आढळला. त्याने उपसरपंचांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, निरीक्षक लता तोडासे घटनास्थळी पोहोचल्या.

घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी निकिताच्या जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे. एमबीए केल्यानंतर निकिता नोकरी करीत होती. तिचे कुटुंबीयही शिक्षित आहेत. 

तिच्या बॅगमधील कागदपत्रांवरून प्रतापनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगमधील तरुणीचा हा मृतदेह  असल्याचे समजले. निकीताची पेट्रोल ओतून निर्घृणपणे हत्या का करण्यात आली, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिस