किन्ही येथे घरफाेडी, १७ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:40+5:302020-12-15T04:27:40+5:30
वेलतूर : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करून राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही ...

किन्ही येथे घरफाेडी, १७ हजाराचा ऐवज लंपास
वेलतूर : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करून राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किन्ही येथे शनिवारी (दि. १२) उघडकीस आली.
रवींद्र माराेती बांगडे (४२, रा. किन्ही, ता. कुही) व त्याचे माेठे भाऊ विजय बांगडे हे कुटुंबीयांसह लग्नानिमित्त ८ डिसेंबरला बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, दाेन्ही कुटुंबीय शनिवारी (दि. १२) गावी परत आले असता, दाेघांच्याही घराच्या दाराचे कुलूप ताेडलेले आढळून आले. कुटुंबीयांनी घरातील साहित्यांची पाहणी केली असता, घरातील कपाटात ठेवलेले राेख ५,००० रुपये व १२ हजार रुपये किमतीची साेन्याची सहा ग्रॅमची चेन आणि नथ असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरट्याने चाेरून नेला. याबाबत रवींद्र बांगडे यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. दरम्यान, ठाणेदार आनंद कविराज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाेलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले असून, या घटनेचा पुढील तपास बिट जमादार मधुकर सुरपाम करीत आहेत.