गॅस एजन्सीच्या कार्यालयात चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST2021-04-27T04:09:15+5:302021-04-27T04:09:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : चाेरट्याने गॅस एजन्सीच्या कार्यालयात प्रवेश करीत आतील २ लाख ८० हजार रुपये चाेरून नेले. ...

गॅस एजन्सीच्या कार्यालयात चाेरी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : चाेरट्याने गॅस एजन्सीच्या कार्यालयात प्रवेश करीत आतील २ लाख ८० हजार रुपये चाेरून नेले. ही घटना भिवापूर शहरात रविवारी (दि. २५) मध्यरात्री घडली असून, साेमवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.
डॉ. रोशन भिवापूरकर, रा. भिवापूर यांच्याकडे इंडेन गॅस कंपनीची एजन्सी असून, त्यांचे भिवापूर शहरातील शिवाजी ले-आऊटमधील गौरीशंकर गुप्ता कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. चाेरट्याने रविवारी मध्यरात्री त्या कार्यालयाच्या शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याचे ड्रावरमधील २ लाख ८० हजार रुपये चाेरून नेले. कर्मचारी साेमवारी सकाळी १० वाजता कार्यालयात गेले असता, त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कर्मचारी रवी गाेजे यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे व ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ४५४ गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहेत.
...
बँक बंद असल्याने रक्कम कार्यालयात
शनिवार व रविवारी बँक बंद असल्याने दाेन दिवसांच्या गॅस सिलिंडरच्या विक्रीतून आलेली संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी कार्यालयातच हाेती. त्यातच साेमवारी एजन्सीचे कार्यालय बंद राहणार हाेते. या बाबींची माहिती असणाऱ्याने ही चाेरी केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.