लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी रविभवन आणि नाग भवन येथे मंत्रिमंडळ सदस्यांना बंगल्यांचे वाटप अखेर निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठतेनुसार यादी तयार करून मंत्र्यांना निवासस्थान देण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्र्यांमध्ये नंबर वन ठरले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तर तिसऱ्या स्थानावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत.
विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांना रविभवनात आणि राज्यमंत्र्यांना नाग भवनात निवास देण्याची परंपरा आहे. मात्र ८ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी वाटपात अडचण निर्माण झाली होती. मंत्रिमंडळात ३६ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. रविभवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान (देवगिरी) यासह सुमारे ३० कॉटेज आहेत. यापैकी ६ कॉटेज विधानसभाध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती आणि दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते यांच्यासाठी आरक्षित असतात. मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी, तर उपमुख्यमंत्र्यांचे निवास देवगिरी आणि विजयगड येथे असते. त्यामुळे रविभवनात उपलब्ध कॉटेजची संख्या २३ राहते. पण कॅबिनेट मंत्री ३६ असल्याने, काही कॅबिनेट मंत्र्यांना नाग भवनातही निवास द्यावा लागला आहे.
वाटप करण्यात आलेल्या यादीप्रमाणे, बावनकुळे यांच्या वर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. बावनकुळे यांच्या मागणीनुसार त्यांना रविभवनात कॉटेज क्रमांक ११ देण्यात आले आहे. भुजबळ यांना कॉटेज क्रमांक १, तर विखे पाटील यांना क्रमांक २ देण्यात आला आहे. कॉटेज क्रमांक ४ मध्ये मुख्यमंत्र्यांचेतात्पुरते (कॅम्प) कार्यालय असेल. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना क्रमांक १८, उपसभापती नीलम गोऱ्हे यांना क्रमांक २०, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना क्रमांक ९, तर उपाध्यक्ष अण्णा बंसोडे यांना क्रमांक १९ मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना कॅम्प प्रमुख म्हणून कॉटेज क्रमांक ६ देण्यात आले आहे.
१२ कॅबिनेट मंत्र्यांचे निवास नाग भवनात ; आज बैठक
या वर्षी नाग भवनात १२ कॅबिनेट मंत्र्यांचा मुक्काम असेल. वरिष्ठतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरि झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या कार्यालय, निवास तसेच वाहन व्यवस्थापनावर या बैठकीत प्रमुख चर्चा होणार आहे.
Web Summary : Minister bungalow allocations finalized for Nagpur's winter session. Chief Minister's camp office in Ravibhavan. Twelve cabinet ministers will reside in Nag Bhavan due to space constraints. Seniority determines assignments; meeting scheduled to discuss arrangements.
Web Summary : नागपुर के शीतकालीन सत्र के लिए मंत्रियों के बंगले आवंटित। मुख्यमंत्री का शिविर कार्यालय रविभवन में। स्थान की कमी के कारण बारह कैबिनेट मंत्री नाग भवन में रहेंगे। वरिष्ठता के अनुसार कार्यभार निर्धारित; व्यवस्थाओं पर चर्चा के लिए बैठक निर्धारित।