शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट व्यापाऱ्यांना दणका

By admin | Updated: January 22, 2016 03:32 IST

आवेष्टित वस्तूवरील छापील किमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या भ्रष्ट व्यापाऱ्यांवर वैधमापन विभागाने

नागपूर : आवेष्टित वस्तूवरील छापील किमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या भ्रष्ट व्यापाऱ्यांवर वैधमापन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेकडो आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. अचानक सुरू झालेल्या विभागाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. वैधमापन शास्त्र विभाग महाराष्ट्र राज्याचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात कारवाया सुरू झाल्या आहेत. या कारवाईत एमआरपी पेक्षा जास्त किमतीत वस्तूची विक्री, आवेष्टित वस्तू नियमांचा भंग यात आवेष्टित वस्तूवर एमआरपी, पॅकिंगची तिथी, निर्मात्याचा पत्ता, वस्तूचे वजन, कस्टमर केअर नंबर व वस्तूचे नाव नमूद नसल्यास ही कारवाई करण्यात येत आहे. नागपूरचे सहायक नियंत्रक यांच्याकडे नागपूर व वर्धा जिल्ह्याचा चार्ज आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईत शेकडो विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काजू-किसमिस पॅकेट, शितपेय, नमकीन, आईस्क्रीम, इलेक्ट्रीक स्विचेस, माचिस व औषधांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ९० च्या वर कारवाया करण्यात आल्या आहेत. तर वर्धा जिल्ह्यात १४ कारवाया झाल्या आहेत. एमआरपीपेक्षा जास्त कि मतीत वस्तू विकण्याच्या प्रकरणात दोन हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तर आवेष्टित वस्तू नियमांचा भंग केल्या प्रकरणात दहा हजार रुपयावर दंडात्मक वसुली करण्याची तरतूद आहे. यात विक्रेता, निर्माता कंपनी व वितरकांवर सुद्धा कारवाई होते. ग्राहकांची फसवणूक होऊ नयेआवेष्टित वस्तू ह्या ग्राहकांच्या अनुपस्थितीत पॅकिंग होतात. ग्राहक हक्क कायद्यानुसार निर्मात्याने, विक्रेत्यांने ती वस्तू योग्य वजनात व ठरवून दिलेल्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध करावी. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अनेक वस्तूंच्या बाबतीत ग्राहकांची फसवणुक होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. -सुनील पलिये, सहायक नियंत्रक