शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विधीसंघर्षग्रस्त बालकांनीच आकाशवर झाडल्या होत्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 21:29 IST

आकाश पानपत्ते (२७, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याच्या खूनप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना मंगळवारी (दि. १९) पहाटे खापरखेडा शिवारातील कोलार नदीच्या परिसरातून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचौघे ताब्यात : मागून गोळ्या झाडल्याची दिली कबुलीनागपूरनजीकच्या खापरखेडा येथील राजबाबा बियार बारसमोरील हत्याकांड

आॅनलाईन लोकमतनागपूर : आकाश पानपत्ते (२७, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याच्या खूनप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना मंगळवारी (दि. १९) पहाटे खापरखेडा शिवारातील कोलार नदीच्या परिसरातून ताब्यात घेतले. दुसरीकडे, या चौघांनी सोमवारी मध्यरात्री आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एकाने आकाशवर मागून तीन गोळ्या झाडल्याची कबुली दिली. खुनाची ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री ८ वाजताच्या सुमारास खापरखेडा येथील राजबाबा बियार बारसमोर घडली होती.चौघेही शनिवारी रात्री ७ वाजतापासून राजबाबा बियर बारजवळील ठेल्यावर नूडल्स खात बसले होते. आकाश पानपत्ते, रजत गुप्ता, पवन खंगार, नीलेश डेहरिया, लोहित चिकनकर व राकेश तांडेकर हे बारमध्ये दारू पिण्यास गेल्याचे चौघांनी बघितले होते. यातील रजत व नीलेशचा गेम करण्याची या चौघांची योजना होती. ठरल्याप्रमाणे आरोपींपैकी दोघे निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर (पल्सर) बसून, कोराडी रोडवर उभे होते. तिसरा हातात माऊझर घेऊन खून करण्यासाठी लपून बसला होता तर चौथा या तिघांनाही माहिती देण्याचे काम करीत होता.रात्री ८ वाजताच्या सुमारास लोहित व पवन भांडत बाहेर आले. पाठोपाठ नीलेश, रजत व राकेश आला आणि तिघेही दोघांची समजूत काढू लागले. त्यात आकाशही बाहेर आला आणि तो त्यांच्या बाजूला असलेल्या दुचाकीवर बसून होता. भांडणामुळे नीलेश व रजतला मारण्याची संधी मिळत नसल्याने माहिती देणारा आरोपी ‘मार मार’ असे बोलत होता. त्यातच अंधारात लपून बसलेल्या तिसऱ्या आरोपीने आकशच्या दिशेने मागून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या आकाशचे डोके भेदून गेल्या.त्यानंतर आरोपीने पंचशील सभागृहासमोरून पळत नांदा - कोराडी रोड गाठला. तिथे माऊझर लपवून ठेवले व तो दोघांसोबत मोटरसायकलने खाप्याला गेला. पुढे एक जण खाप्याला थांबला तर दोघे मोटरसायकलने खाप्याहून पारशिवनीला गेले. चौथा आरोपी मात्र खापरखेडा परिसरातच फिरत होता. दरम्यान, चौघेही खापरखेडा नजीकच्या कोलार नदीच्या परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेत अटक केली. दुसरीकडे, या चौघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती काही जाणकार मंडळींनी दिली.माऊझर जप्तआकाशवर गोळ्या झाडणाºया आरोपीने त्याच्याकडील माऊझर कोराडी - नांदा रोडच्या कडेला लपून ठेवले होते. चौकशीदरम्यान, त्याने या माऊझरबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला घेऊन संबंधित ठिकाण गाठले व माऊझर जप्त केले. आकाश, नीलेश, बादल बोराटे, रजत गुप्ता व वारेगाव येथील राकेश गाडकर यांनी आरोपींपैकी एकाच काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने यातील काहींचा गेम करण्याची योजना आखली होती. मारहाणीच्या दिवशीपासून तो या योजनेवर काम करीत होता.डॉन बनण्याचे इच्छाया खूनप्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन आहेत. यातील एकाची डॉन बनण्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने विविध गुन्हे करायला सुरुवात केली होती. परंतु, त्याला डॉन बनण्याचे स्वप्न दाखविले कुणी, गुन्हे घडवून आणण्यासाठी त्याला माऊझर उपलब्ध करून दिले कुणी, मारहाणीचा बदला हत्या करून घेण्यास त्याला प्रवृत्त केले कुणी, यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. पोलीस याही दिशेने तपास करीतील काय, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर