शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले कोलारजवळ थरार, प्रेमीयुगुलावर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:53 IST

निर्जनस्थळी केले टार्गेट : दाेघे गंभीर जखमी, तिघे आराेपी फरार

खापरखेडा (नागपूर) : हाॅटेलमध्ये जेवण केल्यानंतर प्रेमीयुगुल खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील नांदा शिवारातील किल्ले काेलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. अज्ञात तिघांनी त्या दाेघांना पकडून त्यांच्यासाेबत बळजबरी करून गाेळीबार केला. यात दाेघेही गंभीर जखमी झाले. तिघांनी प्रेमीयुगुलाकडील राेख रक्कम व माेबाइल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना साेमवारी (दि.२२) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत प्रवीण बोंडे (रा. नागपूर) याच्यासह त्याची बाबा फरीदनगर, नागपूर येथे राहणारी २४ वर्षीय मैत्रीण जखमी झाली. हे दाेघेही साेमवारी रात्री दहेगाव (रंगारी, ता. सावनेर) परिसरात फिरायला आले हाेते. त्यांनी दहेगाव येथील एका हाॅटेलमध्ये जेवण केले आणि नंतर माेटारसायकलने किल्ले काेलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. मात्र, दाेघेही महामार्गाने न जाता काेलार नदीवरील पूल ओलांडून स्मशानभूमीच्या दिशेने वळले.

काहीवेळात अनाेळखी तिघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी तरुणीसाेबत अश्लील वर्तन केले. तिने प्रतिकार करताच एकाने प्रवीणला धरून ठेवले. तिघांनी या दाेघांकडील राेख रक्कम व माेबाइल फाेन हिसकावून घेत माेटारसायकलने पळ काढला. त्याचवेळी तरुणीने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला धरून खेचले. त्यातच एकाने तीन गाेळ्या झाडल्या व बंदुकीच्या बटने तरुणीच्या डाेक्यावर वार केला. यातील एक गाेळी प्रवीणच्या पायात शिरली. दाेघांनी काेराडी पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात भादंवि ३९७, ३५४, २५४ (ए), ३५४ (बी), भारतीय शस्त्र कायदा सहकलम ३, २५ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण खापरखेडा पाेलिसांकडे वर्ग केो. दाेघांवर नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आराेपीदेखील जखमी

प्रतिकारादरम्यान तरुणीने दगड भिरकावल्याने तिघांपैकी एका आराेपीच्या डाेक्याला जखम झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पाेलिसांनी तरुणीला घेऊन मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेतले. 

त्या तरुणनीने केला होता प्रतिकार

त्या तरुणीने तीन आरोपींपैकी एका आरोपीच्या डोक्यावर दगड मारला. दगड डोक्यावर लागल्याने तो सुद्धा जखमी झाला. शिवाय, या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलिसांनी सुरू केली आहे. एक दिवसाआधी प्रेमीयुगुलाला लुटल्याची घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.  दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस त्याही दिशेने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर