नागपुरात बनतील बुलेट ट्रेनचे कोच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:39 IST2018-08-01T01:37:56+5:302018-08-01T01:39:24+5:30
उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१८ च्या शेवटी कावासाकी व भेल यांच्यात करार होण्याची शक्यता आहे.

नागपुरात बनतील बुलेट ट्रेनचे कोच!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१८ च्या शेवटी कावासाकी व भेल यांच्यात करार होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनचा बहुतांश मार्ग एलिव्हेटेड राहील. ठाणे व विरार दरम्यान २१ किलोमीटरचा मार्ग हा भुयारी राहील. त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा ७ किलोमीटरचा प्रवास हा समुद्रातून राहील. एका बुलेट ट्रेनमध्ये १० कोच असणार आहे. यातील ५५ सीट बिझनेस क्लास व ६९५ सीट स्टॅण्डर्ड क्लाससाठी राहणार आहे. पुरुष व महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र वॉशरूम राहील. आजारी व्यक्तीसाठी ट्रेनमध्ये स्वतंत्र जागा राहील. ट्रेनमध्ये किड्स चेंजिंग रुमसाठी टॉयलेट सीट्स व सिंक लागले राहील. ट्रेनमध्ये फ्रीजर व हॉटकेसची सुविधा राहणार आहे. प्रत्येक कोचमध्ये एलसीडी स्क्रीन राहील. बुलेट ट्रेनच्या कोचची फॅक्टरी नागपुरात लावण्यासंदर्भात पुष्टी करण्यासाठी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.