वीज पडून बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:40+5:302021-05-20T04:08:40+5:30

भिवापूर : दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. मालेवाडा येथे वीज ...

The bull was struck by lightning | वीज पडून बैल ठार

वीज पडून बैल ठार

भिवापूर : दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटात आलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. मालेवाडा येथे वीज पडल्याने शेतातील एक बैल ठार, तर एक बैल गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे बैल श्रावण देवराव चौधरी यांच्या मालकीचे आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी शेतात मशागतीच्या कामाला लागला आहे. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, चौधरी यांनी जनावरे शेतातीलच एका झाडाला बांधून ठेवली. लगतच एका खाजगी मोबाइल कंपनीचे टाॅवरसुद्धा आहे. पाऊस‌ सुरू असतानाच जोरदार कडकडणारी वीज झाडाखाली बांधलेल्या जनावरांवर पडली. यात एक बैल घटनास्थळीच ठार झाला, तर एक बैल गंभीर जखमी झाला.

===Photopath===

190521\img-20210519-wa0142.jpg

===Caption===

मालेवाडा येथे विज पडून मृत्यूमुखी पडलेला बैल

Web Title: The bull was struck by lightning