वीज पडून बैल ठार, शेतकरी बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:44+5:302021-06-09T04:10:44+5:30

भिवापूर : शेतमजूर बैलबंडीने घराकडे जाण्याकरीता निघाला असतानाच अचानक वीज पडल्यामुळे एक बैल घटनास्थळीच दगावला. मात्र यात सुदैवाने शेतमजूर ...

The bull was killed by lightning, the farmer escaped | वीज पडून बैल ठार, शेतकरी बचावला

वीज पडून बैल ठार, शेतकरी बचावला

भिवापूर : शेतमजूर बैलबंडीने घराकडे जाण्याकरीता निघाला असतानाच अचानक वीज पडल्यामुळे एक बैल घटनास्थळीच दगावला. मात्र यात सुदैवाने शेतमजूर बचावला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मोखाळा शिवारात घडली.

मुन्नेश्वर ठाकरे (रा. भिवापूर) यांची भिवापूर लगतच्या मोखाळा शिवारात शेती आहे. मंगळवारी त्यांच्या शेतातील मजूर शेतात काम करत असताना अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या मजूराने बंडीबैल जुंपून घराकडे जाण्याची तयारी चालविली. दरम्यान, मजूर बंडीवर स्वार होण्यापूर्वीच कडकडणारी वीज यातील एका बैलावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बैल मात्र सैरावैरा पळत गेला. त्या शेतमजूराला कुठलीही दुखापत झाली नसली तरी, डोळ्यादेखत झालेल्या या घटनेमुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे. माहिती मिळताच, शेतमालकाने घटनास्थळी दाखल होत, शेतमजुराला दवाखान्यात हलविलि. त्याची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजते. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा व अहवाल सादर करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: The bull was killed by lightning, the farmer escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.