वीज काेसळल्याने बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST2021-04-21T04:08:46+5:302021-04-21T04:08:46+5:30

कुही : जाेरात कडाडलेली वीज शेतात बांधलेल्या बैलजाेडीजवळ काेसळली. त्यात हाेरपळलेल्या एका बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही ...

Bull dies due to power outage | वीज काेसळल्याने बैलाचा मृत्यू

वीज काेसळल्याने बैलाचा मृत्यू

कुही : जाेरात कडाडलेली वीज शेतात बांधलेल्या बैलजाेडीजवळ काेसळली. त्यात हाेरपळलेल्या एका बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाेली शिवारात मंगळवारी (दि. २०) दुपारी घडली.

विनायक मोतीराम लांजेवार, रा. आकाेली, ता. कुही यांची गावालगत शेती असून, त्यांची बैलजाेडी नेहमीप्रमाणे शेतात बांधली हाेती. दरम्यान, दुपारच्या सुमारास वादळासह जाेरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट त्या बैलजाेडीजवळच काेसळली. त्यात जाेडीतील एक बैल हाेरपळल्याने गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या वादळी पावसाचा जाेर २० मिनिटे कायम हाेता. यात आपले ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती विनायक लांजेवार यांनी दिली. त्यांना शासनाने आपत्ती व्यवस्थापन निधीमधून आर्थिक मदत करावी, अशी मागणीवजा विनंती सरपंच गजानन धांडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Bull dies due to power outage