सोमनाथच्या धर्तीवर राममंदिराची उभारणी करा : विहिंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 08:29 PM2018-11-21T20:29:02+5:302018-11-21T20:30:48+5:30

अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.

Build Ram temple at Somnath's character: VHP | सोमनाथच्या धर्तीवर राममंदिराची उभारणी करा : विहिंप

सोमनाथच्या धर्तीवर राममंदिराची उभारणी करा : विहिंप

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार, खासदारांना वैयक्तिक निमंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.
पत्रपरिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश्वर निवल, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भेंडे, प्रांतमंत्री अजय निलदावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, संयोजक सनतकुमार गुप्ता, सहसंयोजक दिनेश गौर, ‘विहिंप’चे उपाध्यक्ष गोविंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू व अयोध्या येथेदेखील हुंकार सभा होणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. या सभेला ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिपचे कार्याध्यक्ष आलोककुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेला विदर्भ व मध्य भारतातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास यावेळी सनतकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.
राममंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत हिंदू समाजाने संयम ठेवला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लगेच सुनावणी करण्यास नकार दिला. राममंदिराच्या मुद्याला प्राथमिकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या भूमिकेसंदर्भात आम्हाला कुठलेही भाष्य करायचे नाही. त्यामुळे आमचा केवळ इतकाच आग्रह आहे की, केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश पारित करून सोमनाथाच्या धर्तीवर अयोध्येत राममंदिर उभारावे. यासंदर्भात विहिपच्या राष्ट्रीय नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले.

सर्व पक्षीय नेत्यांचे स्वागत
या सभेसाठी कुठल्याही आमदार किंवा खासदारांना स्वतंत्रपणे विशेष निमंत्रण दिलेले नाही. हा मुद्दा जनभावनेशी जुळलेला आहे व जनप्रतिनिधींनी यात स्वत:हून सहभागी होणे अपेक्षित आहे. या सभेला सर्व पक्षाच्या नेत्यांचे स्वागत होईल. सर्वांसाठी ही सभा खुली आहे, असे संजय भेंडे यांनी स्पष्ट केले.
मंचावर संघाचे पदाधिकारी राहणार नाही
संघ परिवारातील स्वयंसेवकांनी हुंकार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मंचावर संघाचे पदाधिकारी राहतील की नाही, हा प्रश्न कायम होता. मात्र ही सभा संतांच्या आदेशानुसार ‘विहिंप’च्या नेतृत्वात होत आहे. मंचावर संत व ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष हेच राहतील, असे भेंडे यांनी स्पष्ट केले.
आठ ठिकाणी ‘पार्किंग’ची व्यवस्था
विदर्भातून एक लाख कार्यकर्ता या सभेसाठी अपेक्षित आहेत. या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ‘पार्किंग’ची सोय आजूबाजूच्या परिसरातील आठ मैदानात करण्यात आली आहे. यात हनुमानगरचे चौकोनी मैदान, प्रोफेसर कॉलनी मैदान, बास्केटबॉल मैदान, मोहता विज्ञान महाविद्यालयाचे मैदान, एसबीसीटी महाविद्यालय मैदान, चंदन नगर मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय मैदान व जैन कलार भवन येथे ‘पार्किंग’ करता येणार आहे, असे सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले.

 

Web Title: Build Ram temple at Somnath's character: VHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.