नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:34 IST2017-08-25T01:33:47+5:302017-08-25T01:34:12+5:30

नागपूर शहराला भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता जलसंचयासाठी कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा,.....

 Build the dam by obstructing the flow of the river | नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा

नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा

ठळक मुद्देजलसंचयासाठी कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता जलसंचयासाठी कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी गुरुवारी महापालिका अधिकाºयांना दिले. दीपराज पार्डीकर यांनी आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊ न पाहणी केली. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड उपस्थित होते. नदीच्या आसपास असलेल्या दगडाने बांध निर्माण केल्यास काही दिवस पाणी उपलब्ध होईल. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात सध़्या २०८ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करणे सुरू असून आहे. वास्तविक या केंद्राची क्षमता एकूण २४० एमएलडी इतकी आहे. उन्हाळ्यात पाण्याची क्षमता २२० एमएलडी इतकी असते, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. मनपाच्या दीर्घकालीन योजनेत बांध तयार करण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे आदेश पार्डीकर यांनी दिले. जलशुद्धीकरण केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा व नागरिकांना पाणी शुद्ध स्वरूपात मिळेल याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

Web Title:  Build the dam by obstructing the flow of the river